रमाकांत आचरेकर: ज्यांनी क्रिकेट देव घडविला
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबई येथे निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. आचेकर गुरुंजी क्रिकेट जगताला अनेक अनमोल हिरे घडवून दिले. त्यातून 'क्रिकेट देव' म्हणून प्रसिद्ध सचिन तेंडुलकरला घडवण्यात सरांचा मोलाचा वाटा आहे.
आचेरकर सरांच्या निधनावर सचिनने श्रद्धांजली वाहत म्हटले की "आचरेकर सरांनी आम्हाला क्रिकेटसोबतच जगण्याचा मार्ग दाखवला. आम्हाला तुमच्या आयुष्यातील भाग होण्याची संधी मिळाली. तुमच्या मार्गदर्शनामुळे क्रिकेट वृद्धिंगत झालं. Well played, Sir. तुम्ही जिथे असाल तिथे अधिकाअधिक खेळाडू घडवाल.
त्यांनी म्हटले की "आचरेकर सरांमुळे देवगतीचं क्रिकेट समृद्ध होईल. माझा पाया रचण्यामागे आचेरक सर आहे. त्याच्यामुळे माझी कारकीर्द घडू शकली. सचिन म्हणे की गेल्या महिन्यात सरांना भेटलो आणि आम्ही जुन्या आठवणी जागवल्या. त्यांचे जितके आभार मानावे कमीच आहे.
1990 मध्ये आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलं. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच वर्षी 'स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड'तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पत्रकार कुणाल पुरंदरे यांनी Ramakant Achrekar: Master Blaster's Master हे आचरेकराचं चरित्र लिहिलं आहे.
सचिन मारली होती झापड
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अलीकडेच एक किस्सा सांगितला होता की आचरेकर सरांनी एकदा त्याला सामना खेळण्यासाठी पाठवले होते. परंतु सचिन सामना सोडून वरिष्ठ खेळाडूंचा सामना पाहत बसला. त्यामुळे सर खूप नाराज झाले होते. त्यांनी सचिनला एक झापडही मारली होती. आणि त्यावेळी आचरेकर गुरुजी म्हणाले होते की इतरांसाठी टाळ्या वाजवण्यात आनंद वाटण्यापेक्षा स्वत:साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत’. सचिनप्रमाणे आचरेकर सरांचा हा उपदेश त्याला आयुष्यभर लक्षात राहिला.’
सरांचं सचिनच्या जीवनात किती महत्त्व आहे हे त्याच्या 16 नोव्हेंबर 2013 रोजी निवृत्तीच्या वेळी देखील दिसून आले जेव्हा सचिनने निरोप घेताना शेवटल्या भाषणात आचरेकर सरांच्या योगदानाचा उल्लेख केला होता.