गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आयआरसीटीसीकडून युजर्ससाठी महत्वाचे ट्विट

आयआरसीटीसीने ट्विट करत सांगितलं आहे की, युजर्सनी आपली वैयक्तिक माहिती, मोबाइल क्रमांक कोणासोबतही शेअर करु नये. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी फक्त अधिकृत लिंकवरच तुमची माहिती मागतं. याशिवाय रिफंड प्रक्रियेसाठीदेखील आयआरसीटीसी कधीच फोन करत नाही.
 
ट्विट व्यतिरिक्त आयआरसीटीसीने आपल्या प्रवाशांना मेलदेखील केला आहे. आयआरसीटीसी कधीच तुमच्याकडे बँक खात्याची माहिती मागत नाही. जर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहिती एखाद्याला देत असाल तर तुमची फसवणूक केली जाऊ शकते.
 
याशिवाय आयआरसीटीसीने सल्ला दिला आहे की, कोणत्याही प्रवाशाने कोणत्याही परिस्थितीत आपला अकाऊंट नंबर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम आणि सीव्हीव्ही कोणासोबतही शेअर करु नये. एखाद्याकडे ही माहिती असेल तर अत्यंत सहजपणे बँक खात्यात घुसखोरी केली जाऊ शकते. रेल्वेचं तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असते. याशिवाय रिफंड झालेले पैसे आपोआप तुमच्या खात्यात जमा होतात. यासाठी रेल्वे कधीच तुमच्या बँकेची माहिती किंवा क्रेडिट कार्ड आणि सीव्हीव्ही क्रमांक मागत नाही. याशिवाय तिकीट रद्द करण्यासंबंधीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणासोबतही शेअर करु नका असे सांगितले आहे.