गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 25 जानेवारी 2020 (16:02 IST)

टिकटॉकमुळे बस चालक कर्मचाऱ्याची नोकरी गेली

टिकटॉकमुळे पुण्यातील बस चालक कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागली  आहे. पीएमपीच्या ई बसमधील चालक भीमराव गायकवाड यांनी टिकटॉक केल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. गायकवाड यांचा बसमधील टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बेकराईनगर डेपोत त्यांनी या टिकटॉकचा व्हिडीओ बनवला होता. याप्रकरणी पीएमपीएल प्रशासनाने गायकवाडला निलंबित केलं आहे.
 
या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिपत्रक काढलं. प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून हे गंभीर आहे. यामुळे महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होत आहे. या प्रकरणी सर्व चालक-वाहक आणि खाजगी बसेस वरील सेवकांना बसमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल न करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना देखील बसमधील व्हिडीओ करण्यास प्रतिबंध करण्याची सूचना करण्यात आली आहे.