बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (14:37 IST)

संभाजी ब्रिगेडची गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून मनसेने आोजित केलेल्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. 
 
राजकीय पक्षाने तिचा वापर करणे चुकीचे आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसे निवेदन पोलीस ठाण्यात दिले आहे. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याला  संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे.