गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By

मग लक्ष्यात आल, अरे चंद्रगुप्त ही तेच आहेत आणि चाणक्य ही तेच आहेत

शरद पवार यांनी गेल्या ५० वर्षात राजकारणात चंद्रगुप्त तयार केला नाही. पण त्यानंतर अस लक्ष्यात आलं की, शरद पवार हेच चंद्रगुप्त ही आणि चाणक्य आहेत असे मत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. शरद पवार हे उभारी घेणारे नेते आहेत त्यांनी कॅन्सर सारख्या आजाराला परत पाठवलं माणसाच काय अस ही नाना म्हणाले.

नाना पाटेकर म्हणाले की, शरद पवार हे माझे हिरो होते. शरद पवार हे माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत. हा माणूस नक्कीच महाराष्ट्रासाठी काही तरी करेल अस नेहमी वाटायचं. त्यामुळे पक्ष अस काही नाही. शरद पवार यांना खासगीत बोललो होतो. की, शरदराव तुम्ही राजकारणातील चाणक्य आहात. हुशार आहात, राजकारण कस करावं हे तुम्हाला माहित आहे. एकच दुर्दैव आहे की, गेल्या ५० वर्षात एक ही चंद्रगुप्त तयार नाही केला. पण, नंतर अस लक्ष्यात आलं….अरे चंद्रगुप्त ही तेच आहेत आणि चाणक्य ही तेच आहेत अस नाना म्हणाले.