शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2020 (12:30 IST)

जुळी मुलं फेकून गेलेले आई-वडिल सापडले

पुण्यात पाषाण तलावाजवळ सापडलेल्या दोन जुळ्या मुलांचे पालक पोलिसांनी शाधून काढले आहे. जुळ्या मुलांचे आई-‍वडिल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे.
 
14 जानेवारी रोजी पाषाण तलावाजवळ सुरक्षा रक्षकांना दोन जुळी मुलं सापडली होती. त्यांची रवानगी ससून रुग्णालयात करण्यात आली होती. नंतर पोलिस त्यांच्या आई-वडिलांचा शोध घेत होती तेव्हा आठ दिवसांनंतर पोलिसांना यश मिळाले. या मुलांची विधवा असून तिला आधीपासून तीन मुली आहेत. लिव्ह इन रिलेशनमध्ये असताना तिला दोन जुळ्या बाळांचा जन्म झाला त्यामुळे त्यांनी दोन्ही बाळांना तलावाजवळ सोडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलांच्या आई-‍वडिलांना ताब्यात घेतले आहे.
 
शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांचा जन्म झाला त्यापासून शोध घेयला सुरुवात झाली. वारजे येथील रुग्णालयात जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचे पोलिसांना समजले. त्यांचा पत्ता मिळवून शोध घेतला. रिक्षाचालक आणि एका महिलेच्या प्रेमसंबंधातून जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. त्यांना जबाबदारी नको होती म्हणून त्यांनी जुळ्या मुलांना तलावाच्या कडेला फेकून दिले.