शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (16:07 IST)

नेहा पेंडसेच्या नवर्‍याचं तिसरं लग्न, शार्दुल दोन मुलींचा बाप

हॉट अभिेनत्री नेहा पेंडसे 5 जानेवारीला पुण्यात विवाहात बंधनात अडकली. तिने शार्दुल सिंगशी लग्न केलं. लग्नापूर्वी ती शार्दुलसोबत रिलेशनमध्ये होती. तिचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शार्दुलचं हे तिसरं लग्न असून त्याला दोन मुली आहेत. त्याचे दोन लग्न झालेले असले तरी त्याने सगळया गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळ्या आहेत असे नेहाने सांगितले.
नेहा आणि शार्दुल लग्नाच्या फोटोंमध्ये खूप खूश दिसत आहे. नेहाने लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर शार्दुलने ही तिला मॅच करत कुर्ता घातला होता. त्यावर फेटा देखील बांधला होता.

हा विवाह मराठमोळ्या पद्धतीने पार पडला. नेहाचं लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर सध्या तिच्याच लग्नाची चर्चा सुरु आहे.