1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. wife report against husband as not ready for physical relation in Pune

पुणे: शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, पत्नीने दाखल केली तक्रार

चिखलीमध्ये पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केल्याचा प्रकार घडला आहे. पतीने माझ्यासोबत पतीने कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत अशी तक्रार पत्नीने केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सांगितले की फेब्रुवारी महिन्यात विवाह झाल्यानंतर आरोपी पतीने आपली आश्वासने पाळली नाही. स्वत:बद्दल चुकीची माहिती दिली तसेच पती शिवीगाळ, मारहाण करतो. मानसिक आणि शारीरिक छळ करतो. महिलेने तक्रारीत म्हटलं आहे की सासरी आल्यानंतर त्याने कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. शिवाय फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे म्हटले.
 
या प्रकरणात पोलिसांनी 33 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. लग्नात 20 लाख रुपये खर्च केल्याचेही महिलेने सांगितले तरी पैशांची मागणी सुरु होती अशी तक्रार सांगण्यात येत आहे. 
 
पोलिस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत.
पुढील लेख
रावळपिंडीचं ते मैदान जेव्हा राहुल द्रविडने गाजवलं होतं...