सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (10:00 IST)

महात्मा ज्योतिबा फुले यांचा संक्षिप्त परिचय

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२० रोजी पुण्यात झाला. त्यांच्या आई वडिलांचे नाव गोविंदराव व चिमणाबाई होते. त्यांचे कुटुंब उदार निर्वाहासाठी माळ्याचे काम करत असत. ते साताऱ्यामधून पुण्याला फुले आणून त्याचे गजरे बनवून विकायचे म्हणून ते फुले म्हणून ओळखले जात असे नंतर त्यांना फुले नावानेच संबोधित केले जात असे. 
 
बाल्यपणापासूनच त्यांची बुद्धी कुशाग्र व तल्लख होती. त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. ते कुशल विचारवंत, क्रांतिवीर, समाजसेवी, चांगले लेखक, व कुशल दार्शनिक होते. 
 
ते सन १८४० रोजी सावित्रीबाईशी विवाहबद्ध झाले. त्या काळी महाराष्ट्रात धर्मसुधारक आंदोलनाची तीव्रता होती, जातिप्रथेचा विरोध केला जात होता. त्या साठी प्रार्थना समाजाची स्थापना केली गेली त्याचे कार्यवाहक प्रमुख गोविंदराव रानडे आणिक आर जी भांडारकर होते.
 
त्या वेळी महाराष्ट्रात जातिवाद बरोबरच स्त्री शिक्षा सारखे गंभीर विषय ज्वलंतशील होते. महात्मा यांनी त्या कुप्रथेला संपविण्यासाठी पाऊल उचलले. त्यांनी स्त्री शिक्षेला महत्त्व देऊन पुण्यात प्रथम मुलींसाठी शाळा उघडून स्त्री शिक्षण सुरू केले. त्यासाठी त्यांना समाजात विरोध पत्करावा लागलाच पण त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण केले व समाजात एक नवीन आदर्श स्थापित केले. त्यांचे विचार सर्वत्र पसरू लागले.
 
अस्पृश्यता, जातीवाद व सर्वांना सामान अधिकार स्त्री पुरुष समानता ह्या मताचे ते होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व त्यांवर कार्य केले त्यासाठी त्यांना "महात्मा" असे नाव मिळाले त्यांना "महात्मा" म्हणूनच ओळखले जाते.
 
२८ नोव्हेंबर १८९० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. महात्मा फुले आज पण त्यांचे विचारायच्या रूपात जिवंत आहे.