मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2020 (17:28 IST)

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार

सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना साथीच्या रोगा दरम्यान फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत  करणार आहे.
 
या विषाणूबद्दलच्या बातम्या सर्व न्यूज चॅनेल, वृत्तपत्र प्रसारित करत आहेत. या सर्वांसाठी फेसबुकने एक इंवेस्टमेंट फंड बनवला आहे. या माध्यमातून कंपनी 25 मिलियन म्हणजे 2.5 कोटी अमेरिकी डॉलर फेसबुक जर्नलिझम प्रोजेक्टच्या माध्यमातून स्थानिक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना दिले जाणार आहे. या इमेरजेन्सी फंडचे उद्दीष्ट म्हणजे या महामारी दरम्यान न्यूज इंडस्ट्रीला मदत पोहोचवणे आहे.
 
याशिवाय फेसबुकने 75 मिलियन डॉलर म्हणजे 7.5 कोटी डॉलर इतर मार्केटिंगसाठी खर्च करणार आहे. फेसबुककडून पहिल्या टप्प्यातील मदत ही अमेरिका आणि कॅनडामधील 50 न्यूज चॅनेलला करण्यात आली आहे. तसेच पब्लिशर्सला मिळालेल्या मदतीतून ते कोरोना विषाणूच्या सर्व बातम्या प्रसारित करत आहेत. यामध्ये रिपोर्टरचा प्रवास खर्च, रिमोट कार्याची क्षमता आणि फ्री-लान्स रिपोर्टसची भरती या कामाचा समावेश आहे. यामाध्यमातून कोरोना विषाणूं संबंधित सर्व माहिती प्रत्येक वृत्तसंस्था कव्हर करत आहे.