गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2020 (22:05 IST)

माहिती आहे का, दोन वर्षांमध्ये सुशांतनं तीन कंपन्यां सुरु केल्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं  मागील दोन वर्षांमध्ये सुशांतनं त्याच्या तीन कंपन्यांची सुरुवात केली होती. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिऍलिटी, मिक्स रिऍलिटी, कॉम्प्युटर सायन्स, हेल्थ प्रमोशन, स्वच्छता, कुपोषण अशा क्षेत्रांमध्ये या कंपन्या महत्त्वाचं योगदान देत आहेत. २०१८ मध्ये सुशांतनं इंसाएई वेंचर ही त्याची पहिली कंपनी सुरु केली होती. चित्रपट, आरोग्य कल्याण आणि संशोधनात ही कंपनी कार्यरत आहे. 
 
सुशांतची दुसरी कंपनी आहे विविड्रेज रेलीटॅक्स. त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती ही या कंपनीशी जोडली गेल्याचं म्हटलं जात आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती या कंपनीच्या संचालक मंडळातील एक सदस्य आहे. २०१९ मध्ये सप्टेंबर महिन्यात त्यानं ही कंपनी सुरु केली होती. सुशांततनं त्याची तिसरी कंपनी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यात सुरु केली होती. समाजसेवेत योगदान देण्यासाठी म्हणून त्यानं ही कंपनी सुरु केली होती.