शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2020 (11:16 IST)

हैराण झालेल्या सोनम कपूरने घेतला मोठा निर्णय!

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याने चांगलाच  सन्नाटा निर्माण झाला आहे. राजकारणाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही घराणेशाही आणि प्रस्थापितांच्या मुजोरीने नवख्यांना किती संधी मिळते आणि मिळाली तरी त्यानंत कसे बाजूला करण्यात येते, याची आता नव्याने चर्चा सुरु झाली आहे. 
 
सुशांतने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडियावर घराणेशाहीवरून सलमान खान, करण जोहर, आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांच्यासारख्या स्टार्सनाही लोकांनी जबर लक्ष्य केले. वरुन सोनमच्या ट्विटने आगीमध्ये तेल ओतण्याचे काम झाले. यामुळे तिला नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली. त्यामध्ये ती प्रचंड ट्रोल झाली. सोशल मीडियातून लोकांचा द्वेष पाहून सोनमने इन्स्टाग्रामवर तिच्या कमेंट सेक्शनला बंद केले आहे. 
 
सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर लोक नैराश्य आणि मानसिक आरोग्याबरोबरच चित्रपटसृष्टीत क्षमता असूनही संधी मिळत नसल्याने उघड बोलू लागले होते. त्यानंतर सोनमने ट्विट केले की, एखाद्याच्या मृत्यूवर त्याची मैत्रीण, एक्स गर्लफ्रेंड, कुटूंब, कलिग यांना दोष देणे म्हणजे अज्ञान आहे. 
 
त्यानंतर सोशल मीडियावर सोनमची चांगलीच धुलाई झाली. त्यानंतर तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. ज्यामध्ये ती करण जोहरच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये ती सुशांतला ओळखत नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला भयंकर संतापाला सामोरे जावे लागल्यानंतर तिने इन्स्टावर कमेंट सेक्शनच बंद करून टाकला.