मिस्टर इंडिया चित्रपटाच्या रीमेक वरून नाराज सोनम कपूर ..
अभिनेते अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी अभिनीत नव्वदीच्या दशकातील गाजणाऱ्या चित्रपट "मिस्टर इंडिया" चे लवकरच रीमेक येणार अशी चर्चा सध्या कलाविश्वात सुरु आहे.
त्यामुळे प्रेक्षक वर्गाला या चित्रपटाची आगमनाची उत्सुकता असून अभिनेत्री सोनम कपूर नाराज असल्याचे समजले आहे.
नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करणाऱ्या मिस्टर इंडिया चा रीमेक येण्याची चर्चा होत
असल्यास त्या चित्रपटातील कलाकारांना या संदर्भात काहीही माहीत नसल्याचे सोनम कपूर ने आपल्या
ट्विटर वरून ट्विट करून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.
काही दिवसापूर्वी चित्रपटाच्या दिग्दर्शक अली अब्बास जफर याने ट्विट करून "मिस्टर इंडियाचा " रीमेक येणार ही माहिती दिली होती.
हे समजल्यास मला किंवा माझ्या बाबांना या संदर्भांत काहीही माहिती नसल्याचे सोनम कपूर याने सांगितले.
दिग्दर्शकाने या संदर्भांची माहिती माझ्या वडिलांना तरी द्यायला हवी होती.असे सोनम ट्विट करतात.
त्यांना न सांगणे हा त्यांचा अनादर आहे .हा चित्रपट माझा वडिलांच्या खूप जवळचा आहे असे त्या लिहितात.