बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2019 (11:02 IST)

सोनम कपूरनं मनातील सांगितलं 'दुःख'

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने भलेही कमी चित्रपटामध्ये काम केले आहे. पण तिने इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट 'वीरे दी वेडिंग' यानंतर ती खूपच चर्चेमध्ये आली होती. तिने अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर सोनम कपूरच्या करिअरमध्ये अशी वेळ आली होती. त्याचवेळी तिच्यासोबत बॉलिवूडचा एकही अभिनेता काम करण्यास तयार नव्हता. या गोष्टींचा सोनमने स्वतः खुलासा केला आहे. 2007 मध्ये 'सांवरिया' चित्रपटामधून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री सोनम कपूरने सांगितले की, मी सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी असल्यामुळे सगळ्यांना वाटते की, मी माझ्या वडिलांची लाडकी मुलगी आहे पण असे काही नाही. लोकांना हे माहीत नाही की, 'आईशा' आणि 'दिल्ली 6' चित्रपटामध्ये करण्यासाठी मी ऑडिशन दिले होते. यानंतर मला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. सोनम म्हणाली की, 'मी सांगू शकत नाही की ते माझ्यासाठी किती अवघड होते. तुम्हाला माहीत नाही की, 'खूबसूरत' चित्रपटामध्ये मला खूप मेहनत घ्यावी लागली होती.