बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2019 (16:08 IST)

आलियाने काढले स्वतःचे चॅनेल

आलियाने पदार्पणाच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' पासूनच आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे. 'हायवे', 'उडता पंजाब', 'राझी' सारख्या अनेक चित्रपटांमधून तिचे अभिनयगुण दिसले होते. आता तिने आपल्या चाहत्यांसाठी अन्य कलाकारांपेक्षा वेगळे पाऊल पुढे टाकले आहे. तिने नुकतेच आपले यू ट्यूब चॅनेल 'आलियाबे' लाँच केले. 
 
पहिल्याच दिवशी या चॅनेलला 87हजारांपेक्षा अधिक लोकांनी सब्सक्राईब केले आणि 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाइक केले! आलिया यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेली होती. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ती नेहमी सक्रिय असते. मात्र, त्यावरच समाधानी न राहता तिने स्वतःचे यू ट्यूब चॅनेलही सुरू करण्याचे ठरवले. 
 
या चॅनेलच्या माध्यमातून ती आपल्या चित्रपटांच्या शूटिंगवेळी झालेल्या गमती-जमती, ' हाईंड द सीन' दृश्ये आणि आपल्या मेहनतीचे व्हिडीओ शेअर करणार आहे. स्वतःचे यू ट्यूब चॅनेल सुरू करणारी ती बॉलिवूडमधील पहिलीच कलाकार आहे.