संबंधित माहिती
- ताराला आवडतात सिद्धार्थच्या 'या' तीन गोष्टी
- Health Tips : वजन कमी करायचे मग करा भेंडीचे सेवन
- ह्या मान्सूनच्या हंगामात तुमच्याकडे बॉटम कपडे असायलाच हवेत!
- योग दिवस: ‘मी 59व्या वर्षी योगासनं सुरू केली आणि आज 12 वर्षांनी मला कसलाही त्रास नाही'
- international yoga day: राशीनुसार योग केला तर मिळेल जीवनात यश
नोरासोबत रोमान्स करणार विकी
बॉलिवूडमध्ये नोरा फतेही एक प्रसिद्ध डान्सर म्हणून ओळखली जाते. तिने 'दिलबर' आणि 'कमरिया' यासारख्या गाण्यांमधून आपल्या डान्सिंग स्किल्सचा जलवा दाखविलेला आहे. आता लवकरच ती अभिनेता विकी कौशलसोबत रोमान्स करताना झळकणार आहे. पण हा रोमान्स कोणत्या चित्रपटात नसून एका गाण्यात आहे. त्याचे असे आहे की, भूषण कुमार यांच्या एका म्युझिक व्हिडिओमध्ये नोरा आणि विकी हे रोमान्स करणार आहेत. या गाण्यातील विशेष बाब म्हणजे, यात विकी कौशलची फूल फ्लेजेड रोमांटिक इमेज झळकणार आहे. याबाबत एका मुलाखतीत नोरा म्हणाली, हा म्युझिक व्हिडिओ माझ्याकडे 'दिलबर' गाणे प्रदर्शित झाल्यानंतरच आला होता. त्यावेळी या गाण्यासाठी एका अभिनेत्याचा शोध सुरू असल्याचे निर्मात्यांनी मला सांगितले होते. हे गाणे माझ्या मागील गाण्यांपेक्षा एकदम वेगळे आहे.
पुढील लेख
