गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2019 (12:05 IST)

ह्या मान्सूनच्या हंगामात तुमच्याकडे बॉटम कपडे असायलाच हवेत!

मान्सूनचा हंगाम सुरु झाला असून, ह्या पावसाळ्यात हि तुम्ही तुमची फॅशन स्टाइल टिकवून ठेवण्यासाठी खाली काही टिप्स देत आहोत. तुम्हाला काहीतरी वेगळीच स्टाइल करायची असेल तर फक्त पारंपरिक बॉटम वापरून चालणार नाही, त्यासाठी तुम्ही बॉयफ्रेंड जीन्स, कूलोट्स ते जिम जीन्स असे अनेक नवीन पर्याय वापरू शकता. जर त्यांना स्टाईल केलेत आणि छोट्या-छोट्या ऍक्सेसरीज त्यावर योग्य रीतीने जोडल्यात तर तुम्ही नक्कीच दीवा सारखे दिसू शकता.
 
पावसाळ्यातील सर्वात ट्रेंडी कपडे, त्यांचा वापर आणि पावसाळ्यात काळजी कशी घ्यावी या बद्दल माहिती सांगितली आहे स्पायकर लाइफस्टाइलचे डिझाईन हेड अभिषेक यादव यांनी, तर कुलोट्स आणि पलाजो बद्दल माहिती सांगितली आहे लीवा चे डिझाईन हेड नेल्सन जाफरी यांनी. तर जाणून घेऊयात यांच्या कडून पावसाळ्यातील फॅशन टिप्स.
 
बॉयफ्रेंड जीन्स
हा आधुनिक फॅशन चा प्रकार असून, बॉयफ्रेंड जीन्सला मुलाच्या जीन्सचा लुक दिलेला आहे. ह्या जीन्स मध्ये आरामदायी, स्लॉची फिट आहे परंतु ते टेंपर्ड आणि स्लिम आवृत्तींमध्ये देखील उपलब्ध आहेत. जीन्स प्रसिद्ध असल्याने, बॉयफ्रेंड जीन्स हि गिगी हदीद आणि रिहाना यांच्या आवडीची  डेनिम बनले आहे. यावर प्लॅन व्हाइट शर्ट किंवा टी-शर्ट घालू शकता. व्हाइट स्नीकर्स आणि व्हाइट कावबॉय बेल्ट अशी ऍक्सेसरीज वापरू शकता.
हाय वेस्ट स्कीनी जीन्स
हि जीन्स दशकाच्या सुरूवातीस फॅशन जगतामध्ये एक बोल्ड ट्रेंडसेटिंग स्टाईल म्हणून प्रसिद्ध झाली. हि  सर्वोत्कृष्ट जीन्स वॊर्डरोब मध्ये असायलाच हवी. छान आणि स्टाइलिश स्वरूपासाठी असलेली हि जीन्स कमरेच्या किंचित वर घातली जाते. हाय वेस्ट स्किनी जीन्सवर बस्टिर टॉप किंवा फिट फॉर्प टॉपसह घालू शकता. संध्याकाळच्या पार्टीसाठी स्मार्ट कॅज्युअल ब्लेझर यावर शोभून दिसते.
 
आधुनिक जीवनशैलीच्या वाढत्या मागणीमुळे डेनिमची स्टाईल बदलत चालली आहे. स्पायकर जिम जीन्स हि स्टाइलिश फिटनेस प्रेमीसाठी तयार केली आहे. ह्या डेनिमचे फॅब्रिक ४ बाजूने स्ट्रेच होते. जी तुम्हाला पावसाळ्यात हि आरामदायी अनुभव देईल, तसेच व्यायाम करण्यासाठी जिम जीन्स सर्वोत्कृष्ट डेनिम आहे. स्पोर्टी लुक असल्याने यावर लाइटवेट जॅकेट सूट होईल.
 
कूलोट्स
कूलोट्स स्टायलिश आधुनिक शहराच्या मुलीची वैशिष्ठ्ये दर्शवतात. रुंद सिल्हूट आणि मध्यम लांबी  असलेले डेनिम कूलोट्स या हंगामातील 'स्ट्रीट स्टाईल स्टॉपर' आहेत.  कुलोट्सवर क्रॉप टॉप उत्तम शोभून दिसते. याचा वापर कॅज्युअल तर होतोच शिवाय कार्यालयीन वापरासाठी सुद्धा होऊ शकतो. 
 
पलाझो
सॉलिड किंवा प्रिंटेड पलाझो घालून आपण शोस्टॉपसारख्या दिसू शकता. विशेष कार्यक्रम निमित्त किंवा कॅज्युअल छायाचित्र घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि हे आश्चर्यकारक अजिबात नाही कारण विस्कोस वापरुन बनविलेले कपडे १००% आरामदायक, सॉफ्ट आणि इको-फ्रेंडली असतात. कॅज्युअल पार्टीसाठी पलाझोवर लाईट ब्लेझर शोभून दिसेल.