बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अखेर गायीला का घाबरत आहे धर्मेंद्र?

बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमे करून लोकांचे मनोरंजन करणारे स्मार्ट आणि सुपरस्टार धर्मेंद्र हल्ली आपला वेळ आपल्या फार्म हाऊसमध्ये घालवत असतात. त्यांना हल्ली निसर्गाच्या जवळ राहणे अत्यंत आवडतं. तसेच इतर कलाकरांप्रमाणेच ते देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. 
 
धर्मेंद्र अनेकदा फार्म हाउसचे फोटो शेअर करत असतात. कधी ट्रॅक्टर चालवताना तर कधी तेथील गायी-ढोरांचे फोटो पोस्ट करत असतात. हल्ली धर्मेंद्रने असे काही लिहित एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामुळे तो लगेच व्हायरल होऊ लागला.
 
या व्हिडिओत एक गाय आपल्याला बछड्यासह दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत धर्मेंद्र यांनी लिहिले की माझी गाय मला आपल्या नवजात बछड्याजवळ येऊ देत नाही. पृथ्वीवरील प्रत्येक आई आपल्या नवजातसाठी संरक्षणात्मक असते. माझ्या सर्व मित्रांना खूप प्रेम... या पोस्टसह धर्मेंद्र यांनी हार्ट इमोजी टाकली.
 
धर्मेंद्र यांच्या या पोस्टावर यूजर्सचे कमेंट येऊ लागले. धर्मेंद्र आपल्या फार्म हाउसचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. अलीकडेच धर्मेंद्र आपल्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसत होते. यापूर्वी धर्मेंद्र आपल्या होम प्रॉडक्शनच्या 'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपटात दिसत होते. हा सिनेमा 2018 साली रिलीज झाला होता. या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल आणि बॉबी देओल देखील होते.
 
अलीकडेच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी मिठाईचा डबा घेऊन एका हॉस्पिटल बाहेर दिसले होते. कारण त्यांच्या मुली एशा देओलने 10 जून रोजी एका मुलीला जन्म दिला आहे. दुसर्‍यांदा आजी-आजोबा झाल्याच्या आनंदात ते लगेच मुलीला भेटायला गेले होते. त्यांच्या सोबत असलेल्या माणसाकडे मिठाईच्या डब्याची पिशवी दिसत होती.
 
एशाचे ही दुसरी मुलगी आहे जिचं नाव मिराया असून पहिल्या मुलीचं नाव राध्या आहे. बहुतेक आता स्वत:ची मुलगी आता केयरिंग आई झालेली बघून गायीला बघून संरक्षणात्मक आईची आठवण झाली असावी. तसेच धर्मेंद्र यांचं लहानपण गावात व्यतीत झालं असल्यामुळे आता त्यांना पुन्हा गावाची ओढ असल्याचे कळून येतं.