शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

धर्मेंद्र-हेमा मालिनी पुन्हा झाले आजी-आजोबा, एशा देओलने दिला दुसर्‍या मुलीला जन्म

हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मुलगी एशा देओलने 10 जून रोजी दुसर्‍या मुलीला जन्म दिला. तिने आपल्या दुसर्‍या मुलीचं नाव मिराया तख्तानी असे ठेवले आहे. एशाने इंस्टाग्राम पोस्टाद्वारे चाहत्यांसोबत आनंद साजरा केला.
 
एशा दुसर्‍यांदा आई बनली आहे. तिची पहिली संतान 2 वर्षाची मुलगी राध्या आहे. एशाने ही बातमी शेअर केल्यासोबतच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. एशाच्या बेपी बंपच्या फोटोंची खूप चर्चा होती. एशाने खूप वेगळ्या प्रकारे आपल्या सेंकड प्रेग्नंसीबद्दल सांगितले होते.
 
एशाने आपली मुलगी राध्याचा सोफ्यावर बसलेला फोटो शेअर करत लिहिले होते की माझं प्रमोशन होणार आहे. मी आता मोठी बहिण होणार. अलीकडेच एशाचं बेबी शॉवर झाले होते. या प्रसंगी शानदार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यात कुटुंबातील जवळीक नातेवाइक आणि मित्र सामील झाले होते. या दरम्यान एशाने गुलाबी रंगाचा वन पीस परिधान केलं होतं. तर एशाचा नवरा भरत तख्तानी पांढरं शर्ट आणि गुलाबी ट्राउजरमध्ये होते.
 
वयाच्या 37 वर्षी एशा दुसर्‍यांदा आई बनली आहे. एशा आणि भरतचे लग्न 29 जून 2012 साली जुहू स्थित इस्कॉन मंदिरात झाले होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रेग्नंसीत एशाने दुसर्‍यांदा 24 ऑग्स्ट 2017 मध्ये प‍ती भरत तख्तानी सोबत लग्न केले होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर 20 ऑक्टोबर 2017 ला एशाने पहिल्या मुलीला जन्म दिला होता.