1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आयुष्यमान खुराणावर स्क्रिप्ट चोरीचा आरोप, गुन्हा दाखल

Ayushmann Khurrana
बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणावर दिग्दर्शक कमलकांत चंद्रा यांनी स्क्रिप्ट चोरीचा आरोप केला आहे. या प्रकरणी चंद्रा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आयुष्मान खुरानासह निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक अमर कौशिक बाला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
कमलकांत चंद्रा यांनी तक्रारीत सांगितले आहे की,  “मी सप्टेंबर 2017 मध्ये आयुष्मान खुराणाला एका चित्रपटाची कथा दिली होती. खुरानाला ती कथा आवडली होती. त्यानंतर माझी आणि आयुष्मान यावर कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र, आता आयुष्मान माझ्या कथेवर निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक अमर कौशिक बाला यांच्यासोबत माझ्या कथेवर चित्रपट तयार करत आहे.”