गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

...तर प्रियंका चोप्राने या मुळे निवडला 10 वर्षांनी लहान नवरा

Priyanka Chopra
प्रियंका चोप्राने मागील वर्षी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. प्रियंका आणि निक यांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय ठरला. कारण निक प्रियंकाहून दहा वर्षांनी लहान असल्यामुळे सर्व हैराण होते.
 
काहींनी या दोघांवर खूप थट्टा केली. अनेक लोकंना हे पटतच नव्हतं की 36 वर्षांच्या प्रियंकाने 26 वर्षांचा नवरा केला तरी का? तेव्हा इतकी चर्चा गाजली असताना ही प्रियंका गप्प होती पण आता ती विषयावर बोलली. तिने दोघांना ट्रोल करणार्‍यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
 
ती म्हणाली की लोकां मनात आमच्या वयातील अंतरावरुन उठत असलेल्या प्रश्नांचे मला आश्चर्य वाटते. मला माहित आहे की लोक आमच्या नात्याबद्दल वाट्टेल ते बोलतात. एखादी मुलीग वयाने मोठा साथीदार निवडते तर त्यात काही हरकत नाही पण वयहून लहान साथीदार निवडल्यास लोकांना पचत कसं नाही. हे सगळ असंगत वाटतं असल्याचे प्रियंका म्हणाली.
 
तर वयाने लहान मुलाशी लग्न का केले यावर बोलताना प्रियंका म्हणाली की माझ्यासाठी वय हा केवळ आकडा आहे. वयापेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचे आहे. एकमेकांवर खरे प्रेम करणारे लग्न करतात, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
 
माहित असावे की गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. विवाह सोहळा भारतीय आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने पार पडला होता. वयाचं अंतर असल्यामुळे तेव्हापासून ही जोडी कायमच चर्चेत राहिले.