1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified सोमवार, 18 मार्च 2019 (12:53 IST)

प्रियांकाने साईन केला बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा

लग्रानंतर प्रियांका चोप्रा पुढे एकदा कामावर परतली आहे. हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्रियांका 'द स्काई इज पिंक'मधून कमबॅक करण्यास तयार झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जोनास ब्रदर्सचा म्युझिक व्हिडिओ 'सकर' रिलीज झाला. जोनास ब्रदर्सच्या या नव्याकोर्‍या म्युझिक व्हिडिओध्ये प्रियांका पती निक जोनाससोबत दिसली. त्यामुळे प्रियांकाच्या फॅन्सना भीती होती लग्नानंतर प्रियांका बॉलिवूडमध्ये काम करेल की नाही, मात्र त्यांच्यासाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. प्रियांकाने आणखी एक नवा सिनेमा साईन केला आहे. लवकरच ती या सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे. मात्र या सिनोबाबत अधिक काही माहिती अजून मिळालेली नाही. 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात प्रियांकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम हे कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. सोनाली बोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 'द स्काय इज पिंक' चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा 13 वर्षीय आयशा चौधरी भोवती फिरते. या वयात तिला पल्नरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे निधन होते. या चित्रपटात आयशाची भूकिा झायरा वसीने साकारली आहे. फरहान अख्तर व प्रियांका चोप्रा आयशाच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये झाले आहे. 'द स्काय इज पिंक' चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.