शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (00:51 IST)

ऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली

priyanka chopra
बॉलिवूड अभिनेत्री  प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की झाली आहे. पुढील महिन्यात ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा पार पडणार आहे. पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडणार असून निकचा मित्रपरिवार या लग्नाला उपस्थित राहणार आहे. यासाठी प्रियांकाची पसंती राजस्थानमधल्या जोधपुर या शहराला असणार आहे. जोधपुर किंवा राजस्थानमधल्या आलिशान राजमहालात हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.