बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (11:17 IST)

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने मेट गाला २०१९ च्‍या सोहळ्‍यात उपस्‍थिती लावली. यावेळी तिच्‍या लुकविषयी जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावरून तिला ट्रोल केले जात आहेत. तिच्‍या या सोहळ्‍यातील गेटअपवरून मीम्‍स व्‍हायरल होत आहेत. 
Camp: Notes on Fashion या थीमअंतर्गत 'मेट गाला'मध्ये प्रियांका चोप्राने वेशभूषा केली होती.  काहींनी प्रियांकाचे कौतुक केले तर सोशल मीडियावर 'मेट गाला'तील प्रियांकाच्‍या गेटअपची चर्चा रंगली. तिचा ड्रेसच नाही तर हेअरस्‍टाईल आणि मेकअपचीही जोरदार चर्चा रंगली. प्रियांकाला ड्रेसवरून ट्रोल करण्‍यात आले.  प्रियांकाच्या लुकशी संबंधित काही विनोदी मीम्स ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पाहायला मिळत आहेत.