सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (09:28 IST)

चीनमध्ये ‘अंधाधून’ सुपरहिट

अभिनेता आयुषमान खुरानाचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अंधाधून’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. गेल्याच आठवड्यात हा चित्रपट चीनमध्ये ‘पिआनो प्लेअर’ या नावाने प्रदर्शित झाला.पहिल्याच आठवड्यात चीनच्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. पाच दिवसात ‘अंधाधून’ने चीनमध्ये ९५. ३८ कोटींची कमाई केली होती. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरव्दारे दिलेल्या माहितीनुसार ‘अंधाधून’ने आता पर्यंत चीनमध्ये तब्बल १३६.६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा तिप्पट आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये भारतामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दोन आठवड्याची एकूण कमाई ही ४१.९० कोटी इतकी होती.