शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (09:27 IST)

चाहत्यांची सेल्फीसाठी गर्दी, नवाजच्या हाताला फ्रॅक्चर

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी एका कार्यक्रमासाठी कानपूरमध्ये आला होता. तेथील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर चाहत्यांची त्याच्यासमोर सेल्फी आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी एकच गर्दी केली होती. या गर्दीत त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. नवाजचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 
 
सेल्फी घेण्यासाठी एका चाहत्याने नवाजला जोरात मागे ओढले होते, त्यामुळे त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती आटोक्यात आणली. नवाजने घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तो म्हणला की, 'माझ्या चाहत्यामुळे मला लागले, पण हे माझ्या प्रति त्याच्या मनात असलेले प्रेम आहे.'