शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वीरे दी वेडींगची कमाई जोरात

box office collection
वीरे दी वेडींगची कमाई दिवसेंदिवस वाढतच आहे. मॉडर्न काळातील मुली आपल्या पद्धतीने आपले आयुष्य जगू शकतात, असा आशय असलेला हा सिनेमा आहे. सिनेमाने चौथ्या दिवशीच ४२ रुपयांची कमाई केली आहे. कमाईची आकडे फिल्म ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या ट्विटर अकाऊंट शेअर केले आहेत. अभिनेत्री करिना कपूर खान, शिखा तलसानिया, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर स्टारर वीरे दी वेडींगने पहिल्या दिवशी १० कोटी, दुसऱ्या दिवशी १२ कोटी आणि त्यानंतर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या विकेंडला तब्बल १३ कोटींचा गल्ला केला. आता मात्र या सिनेमाची एकूण कमाई ४२.५६ कोटी इतकी आहे. याशिवाय ताबडतोब ओपनिंग करणाऱ्या सिनेमांमध्ये वीरे दी वेडींग हा सिनेमा टॉप ५ सिनेमांच्या यादीत दाखल झाला आहे.