testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

#MeToo वर बोलली माधुरी दीक्षित, फेमस लोकांना सर्व ओळखतात, सामान्य लोकांचे काय?

Madhuri Dixit
मागील वर्षी भारतात #MeToo मोहिमेने अनेक लोकांना स्वत:बद्दल घडलेले वाईट प्रसंग मांडण्याची हिंमत दिली होती. यात बॉलीवूडचे अनेक लोकांचा खरा चेहरा समोर आला होता. यात अश्या लोकांच्या चेहर्‍यावरील नकाब उघडण्यात आला ज्यावर चाहत्यांनादेखील विश्वास बसत नव्हता. अजूनही हा विषय निघाला की काही लोकं यावर वक्तव्य देण्यास घाबरतात तर काही बिंदास आपले मत व्यक्त करतात.
अलीकडेच बॉलीवूडची प्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणात फॅन फोलोइंग असणारी माधुरी दीक्षितने देखील #MeToo मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका समारंभात सामील माधुरीला जेव्हा या बद्दल प्रश्न विचारण्यात आले तर तिने #MeToo मोहिमेचा उल्लेख करत सुरक्षित वातावरण आणि सोसायटी असल्याचे म्हटले.

तिने म्हटले की केवळ फिल्म इंडस्ट्रीच का तर इतर प्रत्येक जागी, प्रत्येक इंडस्ट्रीत महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज आहे. अनेक महिलांना दररोज सार्वजनिक ट्रांसपोर्टने प्रवास करताना, किंवा इतर सार्वजनिक जागी वावरताना उत्पीडन सहन करावं लागतं. प्रसिद्ध चेहर्‍यांची गोष्ट मांडण्यात आली सहज प्रत्येकापर्यंत पोहचते परंतू सामान्य लोकांबद्दल काय?
माधुरी म्हणाली की 'आरोपी फेमस चेहरा असल्यास सर्व त्याला ओळखतात पण त्या सामान्य चेहर्‍यांचे काय ज्यामुळे महिलांना उत्पीडन सहन करावं लागतं. महिलांना चांगलं वातावरण देण्याव्यतिरिक्त त्यांना शिक्षित करण्याची देखील गरज आहे ज्याने सुरक्षेसाठी नेहमी निडर होऊन लढा देता येईल.'

उल्लेखनीय आहे की #MeToo मोहीम अंतर्गत बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरविरुद्ध आवाज उचली होती त्यानंतर इंडस्ट्रीत काम करणार्‍या अनेक महिलांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मांडल्या. #MeToo मोहीम अंतर्गत फेसबुक पोस्ट वापरून लेखिका आणि निर्माते विंता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर आरोप केला होता. कंगना राणावत, प्रियंका बोस, श्रुती हरिहरन, डायेंड्रा सोरेस, संध्या मेनन, केट शर्मा, सलोनी चोप्रा, सोना महापात्रा सह अनेक टीव्ही कलाकरांनी देखील स्वत:बद्दल घडलेले अत्याचार लोकांसमोर मांडले.
अनेकांनी आपल्या सहयोगी कलाकारांवर यौन उत्पीडन करण्याचा आरोप लावला होता. यात नाना पाटेकर, आलोक नाथ, कैलाश खेर सह अनेक दिग्गज कलावंताचे नाव सामील आहेत.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....
पुणे- कोल्हापूर बसमध्ये दोघेजण. पहिला :- हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन ...

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप
अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. चित्रपट निर्माता ...

‘रंग माझा वेगळा’ तून हर्षदा खानविलकर नव्या रुपात दिसणार

‘रंग माझा वेगळा’ तून हर्षदा खानविलकर नव्या रुपात दिसणार
स्टार प्रवाहवर येत्या 30 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून मराठी ...

इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी...??

इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी...??
नंतर म्हणा ... माझी आई तुझ्यापेक्षा छान फराळ बनवते.

'रुमी' सहज सापडली !

'रुमी' सहज सापडली !
'गर्ल्स' या चित्रपटाचे बोल्ड असे कॅरेक्टर पोस्टर लाँच झाल्यानंतर पोस्टरमधील 'या' तीन मुली ...