शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2019 (09:35 IST)

मोहन भागवत ट्विटरवर आले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी ट्विटरवर एन्ट्री घेतली. त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरु होताच अवघ्या काही तासांमध्ये हजारो नेटकऱ्यांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली आहे.

@DrMohanBhagwat असे मोहन भागवत यांच्या ट्विटर हँडलचे नाव आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह भैयाजी जोशी, सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, वी भागय्या, अरूण कुमार आणि अनिरुद्ध देशपांजे या संघाच्या नेत्यांनीही ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे. मोहन भागवत ट्विटरवर एक्टिव्ह झाल्याचे समजताच अवघ्या काही तासांमध्ये सात हजार जणांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली आहे.