मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 जून 2019 (17:12 IST)

WhatsApp सारखं अॅप लॉन्च करू शकते मोदी सरकार!

जर आपल्याला सुद्धा व्हॉट्सअॅप अॅप कडून तक्रार असेल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे. भारत सरकार व्हॉट्सअॅप सारखी एक अॅप तयार करत आहे. या अॅपचा वापर सरकारी एजन्सीज दरम्यान संवाद साधण्यासाठी केला जाईल. एका अहवालानुसार सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
 
'सुरक्षा दृष्टीने आमच्याकडे परदेशी कंपन्यांवर अवलंबून नसणारी ई-मेल आणि संदेश प्रणाली असण्याची गरज आहे, असे एका मुलाखतीत एका अधिकार्‍याने सांगितले. किमान सरकारी संपर्कासाठी अशा सिस्टमची त्वरित आवश्यकता आहे. ' ते हे देखील म्हणाले की यावर चर्चा केली जात आहे की आमच्याकडे अधिकृत संपर्कासाठी एक सुरक्षित आणि स्वदेशी विकसित नेटवर्क असावा. व्हॉट्सअॅप प्रमाणेच एक सरकारी अॅप बनवण्याबद्दल चर्चा सुरू आहे.
 
प्रत्यक्षात सरकार विचार करीत आहे की ज्या अॅपवर सरकारी चर्चा होत असो त्याचा संपूर्ण डेटा केवळ भारतातच स्टोअर व्हावा. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की सुरुवातीला या प्रकारची अॅप सरकारी संवाद साधण्यासाठी केला जाईल आणि यशस्वी झाल्यावर, सामान्य जनतेसाठी सादर करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या या योजनेची बातमी तेव्हा समोर आली आहे जेव्हा अलीकडे गुप्तचर चार्जवर अमेरिकेत हुवावेला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. तसेच, Google, Intel आणि Qualcomm सारख्या कंपन्यांनी देखील हुवावेला सपोर्ट देणं बंद केलं आहे.