'इन्स्टाग्राम' ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण
लवकरच 'इन्स्टाग्राम' हा फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मही ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. इन्स्टाग्रामचे नवे प्रमुख एडम मुसेरी यांनी याची घोषणा केलीय. इन्स्टाग्रामचे सध्या जगभरात १० लाख युझर्स आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कार्यभार हाती घेतल्यानंतर एका सार्वजनिक मंचावर बोलताना, दुकानदार - विक्रेते आणि इन्स्टाग्राम युझर्सच्या मोठ्या संख्येला जोडण्याचा आपला उद्देश असल्याचं मुसेरी यांनी म्हटलं होतं.