शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2019 (08:46 IST)

हे विठ्ठला शक्ती दे, बळीराजाला सुखी कर वारीत निघाली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुले

आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, देहू मधुन जगदगुरू तुकाराम महाराज तर नाशिक येथून संत निवृतत्ती नाथांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले, या तिला दोन्ही पालख्यांचे ज्ञानेश्वर महाराज, देहू मधुन जगदगुरू तुकाराम महाराज पुणे शहारात आगमन झाले आहे. आता या वारीत नाशिक येथील आधारतीर्थ आश्रमातील राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची दिंडी देखील सहभागी झाली आहे. ही मुले बळीराजाला सुखी कर, असे विठुरायाला साकड घालण्यासाठी दिंडी घेवून निघाली आहेत. राज्यात दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे आत्महत्या करण्याचे सत्र सुरू असून, करत्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर त्याचा परिणाम पूर्ण घराला अडचणीचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर परवड, शाळेच्या ऐवजी त्यांना शेतामध्ये कामावर जावे लागते. अशाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी नाशिक येथील आधारतीर्थ आश्रम ही संस्था मागील आठ वर्षांपासून काम करत आहे. या संस्थेत राज्यातील ३० जिल्ह्यातील २५ मुले आणि २५ मुली शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्षी या आश्रमातील मुलांचा वारीमध्ये सहभाग असतो. त्यामुळे आता देव तरी त्यांचे ऐकेल असा त्यांना विश्वास आहे.