बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2019 (16:37 IST)

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

What happened to Brian Lara
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.
 
सध्या सुट्टी व क्रिकेट विश्वचषक निमित्ताने लारा भारतात आला आहे. मात्र लाराला अचानक छातीत दुखू लागले होते. त्यामुळे तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. या आगोदर लाराला हृदय विकाराचा एक सौम्य झटका देखील आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला लगेचच ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान तो लवकर बरा व्हावा यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहे. त्याची प्रकृती कशी आहे याबद्दल अजून काही समोर आले नाही.