मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2019 (10:21 IST)

तयारी करा देशातील ४५ बँकामधील महाभारती प्रक्रिया होणार सुरु या आहेत तारखा

इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल म्हणजेच आयबीपीएसने ग्रामीण बँकांमध्ये विविध पदांसाठी जाहिरात दिली आहे. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. देशातील विविध 45 बँकांची या भरती प्रक्रियेत समावेश असून, यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकही असेल. या सर्व पदांसाठी वेगवेगळ्या लिंक दिल्या आहेत. सर्व पदांसाठी 18 जून ते 4 जुलै या काळात अर्ज करता येईल, तर 19 जुलै ही अर्जाची प्रिंट घेण्यासाठी शेवटची तारीख असून, ऑनलाईन पेमेंटही 4 जुलैपर्यंतच करावं लागणार आहे, सर्प पदांसाठी पूर्व, मुख्य कम्प्युटर आधारित परीक्षा, त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. आयबीपीएसच्या ऑफिशिअल कॅलेंडरनुसार, ऑफिस असिस्टंट आणि स्केल वन ऑफिसर या पदांसाठी पूर्व परीक्षेचं आयोजन 3, 4, 11, 17,18 आणि 25 ऑगस्टला असून, ऑफिसर स्केल वनच्या मुख्य परीक्षेचं आयोजन 22 सप्टेंबर आणि असिस्टंट मुख्य परीक्षेचं आयोजन 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रक्रियेनुसार ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 साठी आयोजित केले जातील. अर्ज करण्यासाठी विनाआरक्षित प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे, तर SC/ST/PWBD प्रवर्गासाठी 100 रुपये फी आहे.