शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

NHRSCL Bullet Train Vacancy बुलेट ट्रेन साठी नोकरी भरती सुरु

बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम जोरात सुरु असून नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट पोस्टसाठी भरती केली जात आहे. NHSRCL हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे. सध्या पहिल्या फेजमध्ये यासाठी 13 लोकांची भरती केली जाईल. 
 
यात स्टेशन संचालक, ट्रेन संचालक, रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि दूरसंचार, इलेक्ट्रिकल आणि ट्रॅक सारखे पद सामील आहेत. या लोकांना ऑपरेशन्स आणि मेन्टेनन्सचे लीडर म्हणून प्रशिक्षण दिले जाईल. निवडलेल्या लोकांना, हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर संबंधित ही संस्था चालवणे आणि ऑपरेशन्स, देखरेखीसाठी नव्याने भरती केल्या जाणाऱ्या इतरांना प्रशिक्षण देणे अशी जबाबदारी देण्यात येईल. त्यानंतर NHSRCL लवकरच 28 चालकांची भरतीही करणार आहे. इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी NHSRCL च्या अधिकृत वेबसाइट www.nhsrcl.in वर विजिट करु शकतात.
 
निवडलेल्या उमेदवार ऑपरेशन आणि मॅटेनेंस लीड करतील, जे 508 किमी लांब हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर मुंबई- अहमदाबाद प्रोजेक्ट, याची प्रक्रिया आणि कामासाठी जवाबदार असतील. लोकांना वडोदरा येथील हाय स्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षित दिले जाईल, जपान येथेही खास प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी अर्ज करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तिला जपानी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 
 
या व्यतिरिक्त NHSRCL 28 चालकांची भरती करण्याची योजना देखील आखत आहे. नंतर पुढील वर्षापर्यंत 30 अधिकार्‍यांना O&M ऑर्गेनाइजेशन वाढवण्यासाठी सामील करण्यात येईल. जपानमध्ये प्रशिक्षित कर्मचारी इतर कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करतील. 
 
जपानी तज्ञांच्या अंदाजानुसार, बुलेट ट्रेनच्या  प्रकल्पासाठी सुमारे 4,000 कर्मचारी आवश्यक आहेत. यामध्ये लोकोमोटिव्ह ड्रायव्हर्स, गार्डस, स्टेशन कर्मचारी, ऑपरेशन कंट्रोल सेंटर कर्मचारी, देखभाल कर्मचारी, सिग्नल देखरेख करणारे व विद्युतीय कर्मचारी अशा पदांचा समावेश आहे.
 
उल्लेखनीय आहे की मुंबई-अहमदाबाद अशी ही 320 किमी प्रति तास धावणारी भारतातील पहिली ट्रेन असणार आहे. 2022 मध्ये ही ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे.