शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2019 (08:54 IST)

नरेंद्र मोदी इफेक्ट : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकह अस्थायी सदस्यत्वासाठी आशिया-प्रशांत समुहाने समर्थन

Narendra Modi effect
जगात सर्संवात महत्युवाची असलेल्क्तया संयुक्रात राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)दोन वर्षांच्या अस्थायी सदस्यत्वासाठी आपला शेजारील शत्रू पाकीस्थान सह आशिया-प्रशांत समुहाने सर्वानुमते भारताचं समर्थन केले आहे. आपल्भाया देशासाठी  हा सर्वात मोठा डिप्लोमॅटिक विजय मानला जात आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचं महत्त्व वाढल्याचं हे सिद्ध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण, भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांनी अशी परिस्थिती निर्माण केली आहे त्यामुळे पाकिस्तानलाही भारताचं समर्थन करावंच लागल आहे. यावेळी 15 सदस्यीय परिषदेत 2021-22 च्या कार्यकाळासाठी 5 अस्थायी सदस्यांची निवड 2020च्या आसपास होऊ घातली आहे. तर नवीन सदस्यांचा कार्यकाळ 2021 पासून सुरु होणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. आशिया-प्रशांत समुहाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 2021-22 या दोन वर्षांच्या अस्थायी कार्यकाळासाठी भारताच्या उमेदवारीचं समर्थन मिळाल आहे. सर्व 55 सदस्यांचे समर्थन दिल्याबद्दल आभार मानतो, असं अकबरुद्दीन म्हणाले आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोठा विजय मानला जात आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते आहे असे दिसते आहे.