बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2019 (09:01 IST)

मोदींना मत दिलं ना मग त्यांच्याकडेच जा- कुमारस्वामी

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी एक विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. रायचूरमध्ये त्यांचा दौरा सुरू असताना रोजगाराबाबत प्रश्न विचारणाऱ्या कामगारांना त्यांनी तुमचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारा असं सांगितलं.
कुमारस्वामी कारेगुड्डा गावाकडे बसमधून चालले होते. तेव्हा येरुमारूस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांना रोजगाराचा प्रश्न विचारल्यावर कुमारस्वामी यांनी 'मोदींना मत दिलंत ना मग कामाचं पण त्यांनाच विचारा' असं उत्तर दिलं. 
 
कुमारस्वामी यांनी एका दौऱ्यात एका गावात राहाण्यासाठी 1.22 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे.