बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जून 2020 (08:30 IST)

सुशांत सिंग असा राहणार आहे कायम आठवणीमध्ये

इंस्टाग्रामने सुशांत सिंग राजपूतच्या अकाऊंटचे मेमोरियल अकाऊंटमध्ये रूपांतर केले आहे. Rememberingहा शब्द आता सुशांतच्या अकाऊंटवर लिहिला गेला आहे. मेमोरियल अकाउंट्स म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या जीवनातील आठवणी त्याच्या अकाउंटवरून शेअर केल्या जातात. ज्यामुळे तो व्यक्ती कायम स्मरणात राहण्यास मदत होते. दरम्यान सुशांतच्या निधनानंतर त्याच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढत आहेत. रविवारी त्याच्या फॉलोअर्सची संख्या साधारण ९ मिलियन होती तर सुशांतला १२ मिलियनहून अधिक लोक फॉलो करत आहेत.
 
काही दिवसांपुर्वी सुशांतच्या टीमने एक वेबसाइटही तयार केली आहे ज्यात त्याने सुशांतचे कार्य, विचार, कोट्स आणि त्याच्या संबंधित काही पोस्ट्स शेअर केल्या जात आहेत. सुशांतच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी आणि चाहत्यांमध्ये टिकून राहण्यासाठी ही वेबसाइट तयार केली असल्याचे सांगण्यात येत आहे.  सुशांतने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ नेहमीच इंस्टाग्रामवर असतील जे त्यांच्या फॉलोअर्स केव्हाही बघता येईल.