मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (22:21 IST)

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शनिवारी स्मृतीदिनानिमित्त जगभरातून अभिवादन केले जात असताना अमेरिकेतून खळबळजनक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्निया राज्यातील एका पार्कमधील महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. घटनेनंतर अमेरिकेत राहणार्‍या अनिवासी भारतीयांनी या प्रकाराची कडक शब्दांत निंदा केली आहे. 
 
काही अज्ञात समाजकंटकांकडून कॅलिफोर्निया राज्यातील एका बागेमध्ये बसवण्यात आलेल्या गांधीजींच्या सहा फुटी पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. या गुन्ह्याची स्थानिक प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
 
एका कर्मचार्‍याला २७ जानेवारी रोजी सकाळी जमिनीवर मूर्ती तुटलेल्या अवस्थेत पडलेली आढळली.