सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (09:19 IST)

इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क नाही

ब्रिटन तसेच इंग्लंडमधून भारतात परतणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यातही पुण्यात इंग्लंडवरुन ५४२ प्रवासी आले आहेत. मात्र, यातील अनेकांचा शोध लागत नाही. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. १०९ जणांचा शोध सुरु असल्याचे वृत्त आहे.
 
इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क होत नसल्याची माहिती हाती आली आहे. पत्ता आणि फोननंबरवरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या १०९ जणांचा शोध लागत नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. आता त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.