शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (15:13 IST)

व्हॉईस ओव्हर क्षेत्रात करिअर बनवू शकता, कसे ते जाणून घ्या

आपला आवाज गोड आणि प्रभावी आहे का? आपल्याला आपला आवाज आवडतो ? जर आपले उत्तर होकारार्थी आहे तर आपण नक्कीच व्हॉईस ओव्हर क्षेत्रात आपले करिअर बनवू शकता आणि व्हॉईस ओव्हर कलाकार म्हणून काही पैसे कमावू शकता. चला तर मग ह्याची माहिती घेऊ या.

व्हॉईस ओव्हर म्हणजे काय ?
व्हॉईस ओव्हर ज्याला ऑफ कॅमेरा किंवा ऑफ स्टेज कॉमेंट्री म्हणून देखील ओळखले जाते. हे एक उत्पादन तंत्र आहे, जेथे असा आवाज -जो कथेचा भाग नाही एक रेडिओ, दूरदर्शन उत्पादन, चित्रपट निर्मिती, थिएटर किंवा इतर कोणत्याही प्रेझेंटेशन मध्ये वापरले जाते. व्हॉईस ओव्हर कोणत्याही संवादाच्या व्यतिरिक्त जोडले जाते. हे एक व्यावसायिक ऑडिओ चा एक भाग म्हणून आवाज देण्यासाठी वापर करण्यात येतो. हे गेमिंग, व्हिडिओ, कार्टून, जाहिरातींमध्ये वापरला जातो. तांत्रिक दृष्टया बोलावे तर व्हॉईस ओव्हर कलाकाराची जबाबदारी मुख्यतः लेखी शब्दांना ऑडिओ किंवा व्हॉईस मध्ये बदलायची आहे. या साठी बोलण्याची आणि संवादाची कला प्रमुख आहे.
 
कोण असतात व्हॉईस ओव्हर कलाकार ?
आपण संपूर्ण दिवस आवाज ऐकतो, मग ते मेट्रो रेलच्या घोषणा असो, जाहिराती असो, रेडिओ असो, किंवा फोनवर हेल्पलाइन वर कॉल करताना असो. पण आपल्या हे लक्षात आले का, की हा गोड आणि शांत आवाज कोणाचा आहे ? हा आवाज व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट चा आहे. व्हॉईस ओव्हर कलाकार ऍनिमेटेड चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन शो साठी आपली आवाज देतात आणि दूरदर्शन आणि रेडिओ जाहिरातींमध्ये व्हॉईस ओव्हर कलाकार ऍनिमेटेड पात्रांसाठी आपली आवाज देतात.या मध्ये चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम, ऍनिमेटेड लघु चित्रपट आणि व्हिडिओ गेम समाविष्ट आहे. हे असे लोक आहे की जे आपल्या दैनंदिन जीवनात बदल करण्यासाठी आपली मेहनत आणि प्रयत्न करून आपली आवाज देत आहे. आपण ज्या डिजीटल युगात राहत आहोत, त्यामध्ये व्हॉईस ओव्हर कलाकारांचे महत्त्व आणि वर्चस्व वाढत आहे. यात काही नवल नाही की सध्या व्हॉईस- ओव्हर कलाकार म्हणून करिअर करणे तरुणांसाठी एक उत्तम पर्याय मानले जाते.     
 
व्हॉईस ओव्हर कलाकार म्हणून करिअरशी संबंधित विविध पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करू या. 
व्हॉईस ओव्हर कलाकार कसे बनावे - 
सामान्यतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्यासाठी एक चांगला आवाज एकमात्र निकष आहे हे कदाचित सोपे वाटू शकत, पण जेव्हा व्हिडिओ आणि एका पात्रासाठी व्हॉईस ओव्हर करण्याची वेळ येते, तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर येतात. पण प्रामुख्याने एक चांगला आवाज आणि विविध प्रकाराच्या व्हॉईस मॉड्युलेशन वर नियंत्रण असणे ही व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट बनण्याची प्राथमिक आवश्यकता आहे. तसेच आपल्याकडे भाषा आणि व्याकरणाचे चांगले ज्ञान असायला हवे आणि उच्चारणा वर नियंत्रण असावे. या साठी आपण काही अभिनयाच्या अभ्यासक्रमाची निवड करू शकता, जिथून आपल्याला अभिनयाची पदवी मिळू शकते, कारण व्हॉईस ओव्हरच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे अभिनय करणे आहे.
 
व्हॉईस ओव्हर कलाकार बनण्यासाठी उत्कृष्ट महाविद्यालय आणि अभ्यासक्रम -
नवीन युगातील करिअर पर्याय म्हणून, हे अद्याप हळू-हळू वाढत आहे, असे कोणतेही महाविद्यालये नाहीत जे व्हॉईस-ओव्हर कलाकारांना प्रशिक्षण देतात. परंतु गेल्या काही वर्षात बऱ्याच खाजगी संस्थांनी व्हॉईस कोचिंग अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टी शिकविण्यात मदत करतात. त्या पैकी काही आहेत.
 
* इंडियन व्हॉईस ओव्हर, मुंबई 
* फिलिमेट अकादमी मुंबई 
* व्हॉईस बाजार, मुबंई
 
व्यतिरिक्त, अनेक प्रस्थापित व्हॉईस ओव्हर कलाकारांनी या साठी स्वतःचे प्रशिक्षण वर्ग देखील सुरू केले आहेत. आपण गूगल वर सर्च करून आपल्या क्षेत्रातील अशा संस्था शोधू शकता.
 
व्हॉईस-ओव्हर कलाकारांसाठी सर्वात लोकप्रिय करिअर -
वाढीची क्षमता आणि विविध बाबींना लक्षात घेता आजकाल आपण बघत आहोत की मनोरंजन जाहिरात, कॉर्पोरेट, ई-लर्निंग, अ‍ॅनिमेशन, प्रशिक्षण, विपणन, शिक्षण, रेडिओ आणि इतर कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने समृद्ध आवाजासह व्हॉईस-ओव्हर कलाकारांची मागणी वाढत आहे. या व्यतिरिक्त प्रगत तंत्रज्ञानाने व्हिडिओ गेम, अ‍ॅप, जीपीएस, टेक्स्ट टू स्पीच, इंटरनेट सारख्या क्षेत्रात त्यांची मागणी वाढली आहे.
 
* काही लोकप्रिय करिअर खालील प्रकारे आहेत
* जीपीएस साठी आवाज देणे 
* अ‍ॅनिमेशन चित्रपटासाठी आवाज देणे 
* व्हिडिओ गेमसाठी आवाज देणे 
* जाहिरातींसाठी आवाज देणे 
* कॉर्पोरेट प्रेझेंटेशन 
* रेडिओ जॉकी 
 
अज्ञात करिअर पर्याय असून देखील, व्हॉईस ओव्हर कलाकारांना दिली जाणारी भूमिका आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. हे व्हिडिओसाठी मूलभूत व्हॉईस-ओव्हर क्रियाकलापांपासून सुरू होतो किंवा रेडिओ जिंगल्स साठी आपल्या आवाजाची ऑफर करतो. एकदा आपण यशस्वी आणि स्थापित झाल्यावर चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमासाठी किंवा कार्टून शो मध्ये डबिंग सारख्या उच्च मूल्यांचे प्रकल्प देखील घेऊ शकता.

व्यावसायिक करिअर पर्याय म्हणून या व्हॉईस ओव्हर कलाकारांना बाजारात एक सन्माननीय मोबदला मिळतो. त्या तुलनेत नवीन डोमेन आणि एक लहान उद्योग असल्याने दर्जेदार व्हॉईस-ओव्हर कलाकारांची मागणी चांगली आहे आणि पगार देखील चांगला आहे.