शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शनिवार, 12 डिसेंबर 2020 (11:01 IST)

MBA करण्यासाठी या 6 गोष्टी लक्षात ठेवा

आपल्याला एमबीए करायाचे आहे? जर होय तर या साठी योग्य तयारी आणि योग्य माहिती असणं गरजेचे आहे. एमबीएची पदवी आपल्या कारकिर्दीला नवे पंख लावू शकते. आम्ही सांगत आहोत की आपण एखाद्या चांगल्या बी-स्कूल मधून एमबीए करण्यासाठी आपण कशी तयारी करू शकता.  
 
बी-स्कूल का?  
एमबीए करण्यासाठी आपल्याकडे ठोस कारण असायला हवं. विद्यमान परिस्थितीतून पळ काढणे हे कारण नसावे. पहिले कारण असे देखील होऊ शकत की आपण अंतिम वर्षाचे विद्यार्थी किंवा नवीन पदवीधर आहात आणि आपल्याला चांगली सुरुवात करण्याची संधी मिळत नसेल. म्हणून चांगल्या ब्रँडने दोन वर्षाचे केलेले एमबीए बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थितीला फायदेशीर ठरू शकतो. पहिली नोकरी चांगली असणे आवश्यक असते. जी प्रत्येक वर्षी आपल्या पगाराला वाढवते. एमबीए करण्याचे दुसरे कारण हे असू शकते की आपण करिअर मध्ये बदल करण्याची इच्छा बाळगता कारण आपण सध्या ज्या उद्योगात काम करत आहात ते आपल्याला आवडत नाही किंवा ज्या उद्योग क्षेत्रात आपण काम करता, त्यात तोटा झालेला असेल. हे उद्योग हॉस्पिटीलिटी किंवा टेलीकॉम असू शकतात.  
 
एमबीएची पदवी आपल्याला विश्वास मिळविण्यात मदत करते मग आपण कोणत्याही क्षेत्रात काम केले असेल.  
शेवटचे कारण असे देखील असू शकते की आपण आपल्या डोमेन मध्ये तज्ज्ञ बनून राहण्याऐवजी सामान्य व्यवस्थापन करू इच्छिता. या शिवाय एमबीए करण्यामागे इतर कोणते ही कारण असू शकत नाही. लक्षात असू द्या की एमबीए करणं म्हणजे अधिक पैसे मिळवण्याची हमी नाही. 
 
बी-स्कूल ची निवड कशी करावी.  
सर्वप्रथम हे बघावं की आपल्याला कोणत्या देशात आपले करिअर बनवायचे आहे? जास्तीत जास्त संधीसाठी त्याच देशाचा एमबीए प्रोग्राम निवडा. त्यानंतर खात्रीचे एमबीए ब्रँड शोधा हे काम आपण बातम्यांचा लेख आणि एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून देखील करू शकता. ते ब्रँड आपल्या सीव्ही मध्ये कायम स्वरूपी राहील. त्यासाठी खर्च किती येणार, कालावधी किती असेल (एग्जीक्यूटिव साठी दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी), एमबीए चे प्लेसमेंट कसे आहे आणि कुटुंबापासून त्याचे अंतर किती आहे हे सर्व बघावे लागणार.
 
वेळेचे व्यवस्थापन कसे करावे?
शेवटी आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेशाची तयारी सुरु करा. प्रत्येक एमबीएच्या प्रोग्राममध्ये निवडीसाठी वेगवेगळ्या आवश्यकता असतात. अंतिम मुदत दिली जाते. हा टप्पा पूर्णपणे वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापनाशी जोडलेला असतो. जर आपण नोकरी सोडताना किंवा आपल्या कॉलेजच्या वेळापत्रकात संतुलन साधताना अनेक अनुप्रयोगांचा विचार करीत आहात तर हे फार कठीण काम आहे. म्हणजे पहिल्याच प्रयत्नाला यश मिळेल ह्याची काही शाश्वती नसेल. सर्व एमबीए मध्ये अर्जाच्या प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी वेळेची मर्यादा बघा. पात्रता पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ घ्या.
 
परीक्षेत यश कसे मिळवाल -
एमबीए मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चांगले मार्क असण्याची गरज असते. आंतरराष्ट्रीय आणि एगजीक्यूटिव्ह एमबीए साठी जीमेट असतो तर इतर भारतीय बी-स्कूल साठी कॅट / सीईटी / मॅट / इतर असू शकतात. जीमेट साठी 700+ स्कोअर खूप चांगला आहे. या कडे गांभीर्याने बघितले जाते. भारतात एमबीए साठी चाचणीचे अंक मुलाखतीसाठी एक महत्वाचा घटक असतो. चांगले अंक मिळविण्याचे दोन सोपे मार्ग आहे. पहिले सुमारे 30 उच्च गुणवत्तेचे मॉक प्रश्नपत्र आणि त्याचे उत्तरे मिळवून दिवसातून किमान एक तरी प्रश्नपत्र सोडवा. त्यातलया तात आपल्याला अवघड वाटणारे प्रश्न आधी सोडवा. एकदा काय ते पूर्ण प्रश्न सोडवल्यावर पुन्हा पहिले प्रश्नपत्र सोडवा. अशा प्रकारे ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा किमान तीन ते चार वेळा करा. दुसरे मार्ग म्हणजे तयारीसाठी शिस्तबद्धता शोधणे. या साठी आपण एखाद्या शिकवणीच्या वर्गात प्रवेश घेऊ शकता.
 
निबंध लेखनात प्राविण्यता कसे मिळवाल -
आता आपले प्रयत्न संघटने वर अवलंबून असतील. हे काम एकट्याने करू नका. निवड प्रक्रियेत आपल्याला करिअर आणि आयुष्याशी निगडित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी निबंधाची गरज असली तर आपल्याला आपल्या कामाचे वाचन करण्यासाठी लोकांची गरज लागेल. लिहिण्याचा योग्य दृष्टीकोण म्हणजे आपल्या जीवन आणि प्रेरणांचे पुनरावलोकन करून एखाद्या कथाकारा प्रमाणे सांगा.
 
6 संभाषणात निपुण कसे व्हायचे -
या प्रक्रियांचे अखेरचं व्यत्यय म्हणजे मुलाखत ही आहे. सध्याच्या काळात ही व्हिडीओ कॉल वर होत आहे. हे देखील एक महत्त्वाचे टीम वर्क आहे. निबंध सादर केल्यावर मुलाखतीस शॉर्टलिस्टची वाट बघू नका. 100 स्टॅण्डर्ड एमबीए इंटरव्यू क्वेश्चन डाउनलोड करा आणि त्वरितच मॉक मुलाखत सुरु करा. या साठी आपल्या कुटुंबियातील सदस्य किंवा मित्रांची मदत घेतली जाऊ शकते.