शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:48 IST)

कोविड चाचणी फिरत्या प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण

मुंबईत स्पाईस हेल्थच्या कोविड चाचणी फिरत्या प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण होत असले तरी भविष्यात संपूर्ण राज्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधाही उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले.
 
एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
 
गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यावेळी मुंबईत या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासात मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल अशी माहिती आयुक्त चहल यांनी यावेळी दिली.