शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (14:49 IST)

सरकार थंड असेल तर आता आम्हीच बंड करू, चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा!

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटल परिसरात ११ कवट्या आणि ५२ हाडे सापडली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यात अजूनही अपहरण करणारी टोळी धुमाकूळ घालत असून, आता अल्पवयीन मुलींच्या अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले आहे. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची ३०-३० हजारांत सौदेबाजी चालली आहे. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा चित्रा वाघ यांनी इशारा दिला आहे.
 
वर्ध्यातील आर्वी येथे एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. ती गरोदर राहिली आणि आरोपीने तिला गर्भपातासाठी नेले. ३० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे ११ जानेवारीला कळले. आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता परिसरात काही कवट्या, हाडे व गर्भ आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. तेथे किती अवैध गर्भपात झाले? किती मुले मारली गेली? किती चिमुकल्यांची हत्या झाली? ते सांगता येत नाही, असे सांगत वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.