रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (07:37 IST)

Permission of your parents प्रेमविवाह करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी आवश्यक

marriage
Permission of your parents नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह बाबत एक ठराव केला असून तो राज्यभर चर्चेत आहे. या ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी कार्यालयाने परवानगी देऊ नये, असा ठराव केला आहे. या ठरावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
 
या ठरावामुळे आता गावात कुणाला प्रेमविवाह करायचा असेल तर आईवडिलांचे परवानगी पत्र आवश्यक असणार आहे. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी याबाबतचे ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत राज्य सरकार असे निर्णय घेत असतात. आताच गुजरात सरकारने असा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. पण, ग्रामपंचायतीने असा ठराव केल्यामुळे ही ग्रामपंचायत देशातील पहिलीच ग्रामपंचायत ठरेल असे बोलले जात आहे.
 
ग्रामपंचायत या ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदा करुन आदर्श कुटुंब पद्धती अंमलात यावी, यासाठी आता सरपंच गणेश कातकाडे, सुधीर शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकारी यांचीदेखील भेट घेऊन त्यांना याबाबत सांगणार आहे.
 
या ठरावाबाबत सायखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कातकाडे म्हणाले की, प्रेमविवाहामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सामाजिक मानहानी होत असल्याने आई-वडील टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी गरजेची असल्याचा ठराव संमत केला आहे.