मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (15:11 IST)

महाविकास आघाडीने बोलावली महत्वाची बैठक

uddhav thackeray
महाविकास आघाडीने आज महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहे. ही बैठक संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. महाविकास आघाडीचं भविष्य आणि विधिमंडळातील रणनीती आखण्याबाबत ही बैठक होणार आहे. 
 
अधिवेशनात आपण कुठे कमी पडत आहोत. याचही या बैठकीत विचार होऊन शेवटच्या तीन दिवसात महाविकास आघाडी आक्रमक पवित्रा घेणार आहे. अधिवेशनच्या टप्प्यात महाविकास आघाडीने महत्वाची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकिला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. विविध मुद्यांवर सरकारची कोंडी कशी करता येईल याबाबतची व्ह्यूरचना या बैठकित आखली जाणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे.