1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (08:28 IST)

कर्जतमध्ये सात सरपंच पदासाठी 22 उमेदवार 62 सदस्य पदांसाठी 158 उमेदवारांमध्ये होणार लढत

voting
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 22 उमेदवार तर 62 सदस्य पदांसाठी 158 उमेदवार रिंगणात आहेत. चार उमेदवार बिनविरोध निवडूण आले असून एक जागा रिक्त राहीली आहे. पाच नोव्हेंबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
 
25 ऑक्टोबर रोजी दाखल आणि वैध नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. या कालावधीत थेट सरपंच पदाचे एकूण 38 उमेदवार यांच्यापैकी 16 उमेदवार यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता सात सरपंच पदासाठी 22 यांच्यात लढत होणार आहे. तर निवडणूक होत असलेल्या 67 सदस्य यांच्या जागांपैकी चार जागा बिनविरोध निवड गेले असल्याने आता 62 सदस्य पदांसाठी 158 उमेदवार रिंगणात आहेत तर एका जागेवर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज दाखल केले नसल्याने त्या जागेसाठी निवडणूक होणार नाही.
 
नसरापूर, वदप, गौरकामत, ओलमन, अंभेरपाडा, खांडस आणि नांदगाव या सात ग्रामपंचायती यांची सार्वत्रिक निवडणूक 5नोव्हेंबर रोजी होत आहे. या सात ग्रामपंचायतचे थेट सरपंच पदासाठी 38 नामांकन अर्ज वैध ठरले होते, तर 67 सदस्य यांच्या पदांसाठी 223 नामांकन अर्ज वैध ठरले होते. 25 ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor