लातूरमध्ये शेतकरी जोडप्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली
लातूर तालुक्यात गादवड गावात धक्क्कादायक घटना घडली आहे. इथे एका अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बळीराम रावसाहेब कदम (50) आणि वैशाली उर्फ मंगलबाई बळीराम कदम असे या मृत दाम्पत्याचे नाव आहेत. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गादवड शिवारामध्ये या दोघांचे मृतदेह एका लिंबाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या दाम्पत्याने शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास सारसा रस्त्यावर असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा जरून अकस्मात मृत्यूची नोंद करून दोघाचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.नंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांना देण्यात येतील. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.