बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 19 डिसेंबर 2024 (10:14 IST)

नागपूर मध्ये दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर कुटुंबाला धमकावून 14 लाखांचा ऐवज लुटला

Nagpur News : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये खसाला-मसाला येथील माँ जगदंबानगर संकुलात मुखवटाधारी दरोडेखोरांनी घरफोडी केली. तसेच पती, पत्नी व मुलीला बंदूक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. व 14 लाख रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर फरार झाले. राजेश छेडीलाल पांडे यांच्या फिर्यादीवरून कपिलनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजेश एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच त्यांचे दोन मजली घर आहे. तसेच मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी लॉकरमधून सोन्याचा हार, बांगडी, अंगठी, कानातले असा 164 ग्रॅमचा सोन्याचा ऐवज, 6 लाख रुपये रोख आणि 250 ग्रॅम चांदीचा ऐवज लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी घरातील कोणत्याही सदस्याला इजा केली नाही. एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर असल्याने राजेश अनेकवेळा जमा झालेली रोकड घरी आणायचा. कदाचित त्यामुळेच आरोपीला त्याच्या घरात आणखी मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा होती. गेल्या हिवाळी अधिवेशनात घरफोडीच्या घटनांमुळे पोलीसही हतबल झाले होते. गुन्हे शाखेची तीन पथकेही आरोपींच्या शोधात आहे.  

Edited By- Dhanashri Naik