बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (08:35 IST)

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 94 रुग्णांचा मृत्यू, बाधितांची संख्या दोन लाखांच्या पुढे

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनामुळे 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 265 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 2 हजार 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबधितांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
 
शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 667 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 72 हजार 669 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
रविवारी 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 2 हजार 669 तर शहराच्या बाहेरील एक हजार 217 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
 
शहरात 25 हजार 319 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 17 हजार 40 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 8 हजार 279 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. शहरातील 246 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 8 हजार 662 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.
 
पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 8 हजार 370 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 3 लाख 61 हजार 83 जणांनी लस घेतली आहे.